Sunday, June 8, 2025
Homeक्राईम न्यूजभाजप शहराध्यक्षपदासाठी कोणीच तयार होईना ! सध्यातरी शहराध्यक्ष पदावर धीरज घाटे कायम

भाजप शहराध्यक्षपदासाठी कोणीच तयार होईना ! सध्यातरी शहराध्यक्ष पदावर धीरज घाटे कायम

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या शहर अध्यक्ष पदावरूनसध्या मोठी रस्सीखेच सुरू आहे, असे वातावरण सुरू असताना चक्क प्रदेशाध्यक्षांनी विचारणा केल्यानंतर कोणीच या पदावर काम करण्यासाठी तयार होईना, अशी स्थिती झाली आहे. पुणे शहराचे विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे यांची मुदत संपण्यापूर्वीच शहरात भाजपच्या शहराध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली होती. सुरुवातील भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी माजी खासदार अनिल शिरोळे यांचे पूत्र शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे नाव पुढे आले. त्यांना पक्षाकडून पदासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, त्यांनी मतदारसंघात काम करावयाचे असे सांगून अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला.

दरम्यान, भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी कसब्याचे आमदार हेमंत रासने यांचे नाव चर्चेत आहे. त्याच वेळी पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बीडकर आणि श्रीनाथ भिमाले यांचे नाव चर्चेत आले. ओबीसी कार्ड चालविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पक्षाचे निरीक्षक पुण्यात आले. त्यांनी मते जाणून घेतली. त्यानुसार तीन नावे निश्चित करून ती प्रदेश पातळीवर पाठविण्यात आली होती. एक मे रोजी शहराध्यक्षपदाचे नाव जाहीर होणार अशी चर्चा होती. मात्र, आता तर कोणीच पद स्वीकारत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहराध्यक्ष पदावर धीरज घाटे हेच कायम राहणार आहेत हे निश्चित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments