Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजभाजपची ताकद वाढणार; गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार

भाजपची ताकद वाढणार; गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात महायुती सरकार सत्तेवर आलं. महायुतीमध्ये सामील होण्यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आजी-माजी नेत्यांची मोठी झुंबड उडाली आहे. अशातच आता गंगाखेड विधानसभेचे माजी आमदार सीताराम घनदाट भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथील प्रदेश कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे भाजपला परभणी जिल्ह्यात मोठे बळ मिळणार आहे.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिलेले सीताराम घनदाट यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या रासपचे गंगाखेडचे विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांचा मात्र टेन्शन वाढणार आहे. तीन वेळा आमदार असलेल्या घनदाट यांनी अभ्यूदय बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मोठं जाळं निर्माण केलं. आज सिताराम धनदाट यांच्यासोबत आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती सदस्य यांच्यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत.

सीताराम घनदाट यांनी 2004 साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती त्यावेळी ते पराभूत झाले होते. त्यानंतर 2009 साली विधानसभा निवडणूकीत ते निवडून आले. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून ते 2009 मध्ये आमदार होते. नंतर ते निवडणुकीतही अपक्ष रिंगणात उतरले होते, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन आमदार मधुसूदन केंद्रे या दोघांनाही पराभवाची धूळ चाखावी लागली. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड मतदारसंघातून बाजी मारली होती. या राजकीय अपयशानंतर आता सीताराम घनदाट भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments