Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज भाच्याकडून मामाची तब्बल 80 लाखांची आर्थिक फसवणूकः कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

भाच्याकडून मामाची तब्बल 80 लाखांची आर्थिक फसवणूकः कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मामाने बांधकाम साहित्य पुरविणारे दुकान भाच्याला चालवायला दिले होते. मात्र भाच्याने दुकानातील साहित्य परस्पर विकले, तसेच घरातील चेक स्वतःसाठी वापरून मामाची 80 ते 90 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकारसमोर आला आहे. याप्रकरणी भाच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मागीलाल चुनाजी पुरोहित (वय-४४, रा. मरकळ रोड, आळंदी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तुलशी जीवराम पुरोहित (वय ३५, रा. हिंजवडी, पुणे) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २०१६ ते २०२२ या दरम्यानच्या काळात झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी मागीलाल पुरोहित आणि आरोपी तुलसी पुरोहित हे मामा भाचे आहे. मागीलाल यांचे आशापुरा स्टील हे बांधकाम साहित्य पुरविण्याचे दुकान आहे. मांगीलाल यांनी हे दुकान तुलशी पुरोहितला चालवायला दिले होते. आरोपी तुलसीने दुकानातील मालाची परस्पर विक्री करून त्यातून आलेले १५ लाख स्वतःकडे ठेवले. तसेच फिर्यादी यांनी घरामध्ये सही करून चेक ठेवले होते. यातील ६ लाख २९ हजाराचे चेक परस्पर दुसऱ्याला देऊन टाकले. दुकानातील इतर माल विकून त्यातून आलेले २० ते २५ लाख ग्राहकांकडून रोख स्वरूपात घेऊन स्वतःकडे ठेवले. तर आरोपी तुलशीने इतर व्यापाऱ्याकडून ४५ लाखांची उधारी करून फिर्यादी यांची ८० ते ९० लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस उसगावकर पुढील तपास करत आहेत.

 

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments