Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजभागवत कराड यांनी बारामतीत घेतली सुनेत्रा पवारांची भेट....

भागवत कराड यांनी बारामतीत घेतली सुनेत्रा पवारांची भेट….

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामती – शुक्रवारी (ता. 15) केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी बारामतीत लोकसभेच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सहयोग सोसायटी येथे सदिच्छा भेट घेतली.

कराड हे सासवडवरुन मोरगाव येथे श्री मयुरेश्वराचे दर्शन घेऊन भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप खैरे यांच्या शाळेमधील शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी गेले. सुनेत्रा पवार बारामतीतच असल्याची माहिती मिळाल्यानंतर भागवत कराड आवर्जून बारामतीत आले व त्यांनी पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

या प्रसंगी अजित पवार यांचे चिरंजिव जय पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर, भाजप पदाधिकारी दिलीप खैरे, अविनाश मोटे, मारुतराव वणवे, गोविंद देवकाते, आकाश कांबळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आदी उपस्थित होते.

सुनेत्रा पवार यांनी पुष्पगुच्छ देत कराड यांचे स्वागत केले. दोघांमध्ये आगामी निवडणूकीच्या संदर्भात अनौपचारिक चर्चाही झाली. अनेक वर्षानंतर भाजपच्या पदाधिका-यांनी आज अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानी हजेरी लावली. या मध्ये वासुदेव काळे, दिलीप खैरे, बाळासाहेब गावडे आदींचा समावेश होता.

सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असतील ही बाब स्पष्ट असल्याने आता भाजपच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्याशी संवाद वाढविला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (ता. 17) बारामतीत भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे समन्वय बैठक घेणार असून त्यात भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments