Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजभाऊबंदकीचे पवॉरः बारामतीच्या निवडणुकीवरून संघर्ष; 17 फेब्रुवारीलाच अजितदादा म्हणाले होते, 'मला एकटे...

भाऊबंदकीचे पवॉरः बारामतीच्या निवडणुकीवरून संघर्ष; 17 फेब्रुवारीलाच अजितदादा म्हणाले होते, ‘मला एकटे पाडताहेत’

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

काहीही झाले तरी पवार कुटुंबात राजकारण वेगळे आणि नाती वेगळी, असा दावा शरद पवार, सुप्रिया सुळे व अजित पवार वारंवार करायचे. पण आता दादांच्या बंडानंतर हे दावे पोकळ ठरत आहेत. बारामतीतून अजित पवार यांनी बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पत्नी सुनेत्रा यांना निवडणुकीला उभे केले. पवार फुटुंबीयांना दादांचा हा निर्णय पहला नाही. त्यापैकी काहींनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत सुप्रियांचा प्रचार सुरू केला आहे. अजित पवारांनी हे गृहीत धरले होते. त्यामुळेच १७ फेब्रुवारी रोजी त्यांनी एका मेळाव्यात “मला कुटुंबातून एकटे पाडले जाईल’ असे भाकीत केले. त्यानुसार पडसाद उमटत आहेत. दादांचे सख्खे बंधू श्रीनिवास यांनी अजित पवारांना नालायक संबोधून आपण अजिबात त्यांच्यासोबत नसल्याचे सांगितले

पदे देणाऱ्यांनाच घरी बसवणे अयोग्य : श्रीनिवास

काटेवाडीत श्रीनिवास म्हणाले की, जमीन आपल्या नावावर केरली माणून त्यांना घराबाहेर काढायचे नाही. आपण औषध विकत आणतो तेव्हा त्यावर एक्सपायरी डेट असते, तशी नात्यांना देखील असते. आता वाईट वाटून प्यायचे नाही. मला दवून जगायचे नाही. स्वाभिमानाने जगायचे आहे. ज्या शरद पवारांमुळेच पदे मिळाली त्याच साहेबांना आता तुम्ही घरी बसा, कीर्तन करा, असे म्हणत आहात हे पटत नाही. अजित पवार नालायक माणूस आहे. वडीलधान्यांचा मान त्यांना ठेवता येत नाही.

श्रीनिवास यांच्या पत्नी शर्मिला

साहेबांनी आपल्यासाठी काय केले, हा प्रश्न विचारणे म्हणजे आई-वडिलांनी माझ्यासाठी काय केले, असे विचारण्यासारखे आहे.

असा सुरू झाला दादांना घरातून विरोध

२ जुलै २०२३ : अजितदादांचे बंड. १२ जुलै : श्रीनिवास यांचे पुत्र युगेंद्र हे शरद पवारांना भेटले. २१ फेब्रुवारी २०२४ : युगेंद्र यांनी सुप्रियांचा प्रचार सुरू केला. अजितदादांवर अप्रत्यक्ष टीका. २८ फेब्रुवारी : चुलत बंधू, रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनीही दादांवर हल्लाबोल केला. १५ मार्च : सुप्रिया सुळेंच्या इंदापूर तालुका प्रचाराची जबाबदारी शरद पवारांनी दादांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांवर सोपवली. १५ मार्च : अजित पवार बारामतीकरांना म्हणाले, ‘जे कधी १५ वर्षांत तुमच्याशी बोलले नाहीत ते आता भावनिक बोलतील. मला घरात एकटे पाडले जाईल.’ १८ मार्च: श्रीनिवास व त्यांच्या पत्नीची अजित पवारांवर टीका. (रोहित पवार यांच्या आई सुनंदा आणि बहीण सई यांनी तीन आठवड्यांपासूनच सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू केला आहे.) अजितदादाही पवार, सुप्रियांवर जाहीरपणे टीका करू लागले.

दादांचे मौन, मिटकरींचे उत्तर

अजित पवारांनी या विषयावर बोलणे टाळले. पण त्यांचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी म्हणाले, ‘भावांना एकमेकाविरुद्ध उभे करण्याचा कुटिल डाव खेळून निवडणूक जिंकू असे वाटत असेल तर हा तुमच्या भ्रमाचा भोपळा आहे हे वरिष्ठांनी लक्षात घेतले पाहिजे. आम्ही रक्ताचं पाणी करू. पण सुनेत्रा पवारांचा विजय खेचून आणणारच.’

रोहित पवार : श्रीनिवास पवारांची भूमिका हीच महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाची भूमिका आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments