Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजभर रस्त्यावर स्कूल व्हॅन चालकावर कोयत्याने हल्लाः शाळकरी मुले व्हॅन मध्ये असतांना...

भर रस्त्यावर स्कूल व्हॅन चालकावर कोयत्याने हल्लाः शाळकरी मुले व्हॅन मध्ये असतांना झाली घटना; अल्पवयीन आरोपी ताब्यात

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

व्हॅन मालकासोबत न्यायालयात गेल्याच्या रागातून दोघांनी स्कूल व्हॅन चालकावर कोयत्याने हल्ला केला. यावेळी व्हॅन मध्ये शालेय विद्यार्थी होते. यावेळी आरोपीने केलेल्या हल्लयात व्हॅनची काच फुटले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.

याप्रकरणी व्हॅन चालक सचिन दिगंबर इंगोले (वय २७, रा. काळूबाई नगर, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हल्ला करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास बकोरी फाटा बी जे एस स्कुल गेट नं. २ समोर घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन इंगोले हे मोहन कदम यांच्या स्कुल व्हॅन वर चालक आहेत. कदम यांच्यावर एका प्रकरणात गुन्हा दाखल आहे. फेब्रुवारी महिन्यात सचिन इंगोले हे कदम याच्या सोबत न्यायालयात गेले होते. आरोपीला याचा राग आला होता. न्यायालयात का गेला याचा राग मनात धरून त्याने मित्राच्या सहाय्याने स्कूल मधून व्हॅन निघाल्यानंतर चालक इंगोले याच्यावर कोयत्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला. व्हॅनची पुढील व चालकाच्या बाजूची काच या हल्यात फुटली. यावेळी आरोपीने सचिन इंगोलेला कॉलर पकडून खाली खेचण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने घाबरलेले विद्यार्थ्यांनी आरडा ओरडा केला. यानंतर हे हल्लेखोर पळून गेले. या प्रकाराने व्हॅन मधील विद्यार्थी घाबरले. ही घटना कळताच पालक शाळेत पोहचले व मुलाना घरी नेले. भर रोडवर हा हल्याचा प्रकार घडला. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments