Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज भररस्त्यात पेटवून घेतलेल्या व्यक्तीला गृहमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलिसांची मदत, पुण्यातील घटना

भररस्त्यात पेटवून घेतलेल्या व्यक्तीला गृहमंत्र्यांच्या ताफ्यातील पोलिसांची मदत, पुण्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : कौटुंबिक वादातून एकाने पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना येरवड्यातील लूप रोड परिसरात सोमवारी घडली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गोल्फ क्लब रस्त्याने जाणार होता. त्यावेळी पेटवून घेतलेल्या व्यक्तीला बंदोबस्तावरील पोलिसांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले.

बबलू माणिक गायकवाड (वय ४०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे गंभीर भाजलेल्याचे नाव आहे. येरवड्यातील लूप रोड परिसरात पीएमपी बस थांब्याजवळ एका व्यक्तीने पेटवून घेतल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला सोमवारी दुपारी मिळाली. त्याचवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा तेथून जाणार होता. त्यामुळे येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्वरित गायकवाड यांना रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून गायकवाड यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments