Thursday, November 7, 2024
Homeक्राईम न्यूजभरधाव बुलेट दुभाजकावर आदळली; महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना

भरधाव बुलेट दुभाजकावर आदळली; महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू, पुण्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील एरंडवणे भागातील भरतकुंज सोसायटी परिसरात भरधाव बुलेट दुभाजकावर आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच बुलेटच्या धडकेत पादचारी ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि युवक जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.) दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

यश कमलेश दहिवळ (वय १७, रा. दहिवळ बिल्डींग, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) असं अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अपघातात पादचारी श्रीकांत दत्तात्रय दातार (वय ८६, रा. अलंकार सोसायटी, कर्वेनगर), जयराज राजेश हुलगे (वय १८, रा. आनंदविहार सोसायटी, सिंहगड रस्ता) हे दोघे जखमी झाले आहेत. याबाबत पोलीस हवालदार रामदास गोरे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यश दहिवळ हा एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होता. एरंडवणे भागातून गुरुवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास तो महाविद्यालयातून बुलेटवरुन घरी निघाला होता. यावेळी भरतकुंज सोसायटी येथील अप्पासाहेब कुलकर्णी पथ परिसरात त्याचे नियंत्रण सुटून भरधाव बुलेट दुभाजकावर आदळली.

या अपघातात यशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच पादचारी दातार, हुलगे यांना बुलेटने धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या यश, पादचारी दातार, हुलगे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच यशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक सुरेखा चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीक्षित तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments