इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
झारखंड: झारखंडमधल्या पाकूरमधून एक धक्कादायक घटना समोरआली आहे. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे पत्नीने पतीची निघृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीने पतीवर विटेने हल्ला करून त्याचे गुप्तांग चिरडले आहे, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. कमाली पहारीया असं आरोपी पत्नीचं नाव आहे. तर लोफ्रा पहारिया असं मृत पतीचं नाव आहे.
अधिक माहिती अशी की, हि घटना झारखंड पाकूर येथे घडली आहे. पाकूर जिल्ह्याच्या हिरणपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या धरनीपहाड गावातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मद्यपान आणि अनैतिक संबंधांवरून भांडण झाले. दारूच्या नशेत पती लोफ्रा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर टीका करत होता. यादरम्यान दोघांमध्ये हाणामारी झाली. पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. त्यानंतर संतप्त पत्नीने वीट उचलून पतीच्या डोक्यात घातली आणि त्यानंतर गुप्तांगावर मार दिला. यात पती लोफ्रा पहारिया याचा मृत्यू झाला.
ही माहिती लोकांना कळताच गावात एकच खळबळ उडाली. यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी महिलेला अटक केली आहे.