Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजभंडाराः सीतासावंगी जंगलात दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

भंडाराः सीतासावंगी जंगलात दोन वाघांच्या झुंजीत एकाचा मृत्यू

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

तुमसर (भंडारा) : तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातीलसीतासावंगी जंगलात दोन वाघांमध्ये झालेल्या भीषण झुंजीत एका नर वाघाचा मृत्यू झाला. मृत वाघाच्या मानेवर, पाठीवर आणि डोक्यावर गंभीर जखमा आढळल्या असून, शरीरातील अनेक हाडे तुटलेली होती. या घटनेमुळे वनविभाग सतर्क झाला आहे.

१७ फेब्रुवारीला सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील सहवनक्षेत्र कवलेवाडा, सीतासावंगी कक्ष क्रमांक ६५ येथे गुराख्याने एका वाघाचा मृतदेह आढळल्याची माहिती वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृत वाघ नर जातीचा असून, तो साधारणतः तीन ते चार वर्षांचा असल्याचे स्पष्ट झाले. संध्याकाळ झाल्याने तत्काळ शवविच्छेदन करणे शक्य नव्हते. त्यामुळे १८ फेब्रुवारीला सकाळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानुसार, मृतं वाघाच्या शरीरावर खोल जखमा आणि तुटलेली हाडे आढळली, ज्यावरून दुसऱ्या वाघाशी झुंज झाल्याचे स्पष्ट झाले.

शवविच्छेदनानंतर मृत वाघाच्या शरीराचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. वनविभागाच्या नियमांनुसार, मृत वाघाचे संपूर्ण शरीर दहन करून त्याची खात्री करण्यात आली. या घटनेची सखोल चौकशी सुरू असून, पुढील कार्यवाही उपवनसंरक्षक राहूल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी रितेश भोंगाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी अपेक्षा शेंडे आणि भंडारा वनविभागाचे कर्मचारी करीत आहेत. ही घटना वन्यजीव संघर्षांचे उदाहरण असून, यामुळे परिसरातील वाघांच्या हालचालींवर अधिक बारीक लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments