Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजब्रेकिंग...! पुण्यातील लोहियानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर कोयत्याने वार; 9 जणांवर गुन्हा दाखल

ब्रेकिंग…! पुण्यातील लोहियानगरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यावर कोयत्याने वार; 9 जणांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्यातील लोहियानगर भागातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. अक्षय दत्ता ढावरे (रा. लोहियानगर, गंज पेठ) असे जखमी झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी अतुल खान, सलमान उर्फ बल्ली शेख यांच्यासह नऊजणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अक्षयचे भाऊ नागेश ढावरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय ढावरे हे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे कसबा मतदार संघाचे उपाध्यक्ष आहेत. आरोपी आणि ढावरे यांच्यात तोंड ओळख असून ते एकाच भागात राहण्यास आहेत. रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अक्षय आणि त्यांचे मित्र शंकरशेठ रस्ता परिसरातील एकबोटे कॉलनीतील हॉटेलवर चहा पित बसले होते. त्यावेळी दुचाकींवरून आरोपी आले.

‘लोहियानगरमें मसिहा बन रहा है, आज इसको मारने का’ असे म्हणून आरोपींनी अक्षय यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यावर कोयता आणि पालघनने हल्ला करत परिसरात दहशत माजवली, असे ढावरे यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments