इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
शिरूर : निमोणे ता. शिरुर येथून अपघाताचीबातमी समोर आली आहे. बोलेरोने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. शंतनु सोमनाथ जाधव (वय १८ वर्ष, रा. निमोणे ता. शिरूर जि. पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सानिका सचिन कांबळे (वय-१६ वर्ष, रा. गारमळा, मांडवगण फराटा ता. शिरूर जि. पुणे) जखमी झाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमनाथ दादा जाधव यांनी फिर्याद दिली असून अज्ञात बोलेरो गाडीवरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी हा अपघात निमोणे ता. शिरूर येथे घडला आहे.
सोमनाथ जाधव हे स्कुटी गाड़ी क्रमांक. एम. एच. १२ यु. वाय.०९५१ वरून मुलगा शंतनु व साडुची मुलगी सानिका कांबळे यांना गुनाट येथुन आणण्यासाठी निमोणे ते गुनाट रोडने जात असताना निमोणे येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ गेल्यावर शंतनु व सानिका असे दोघे रोडच्या कडेने निमोणेकडे बोलत येताना दिसल्यावर जाधव नायरा पेट्रोल पंपांचे जवळ रोडचे पलीकडे बाजुस गाडी लावुन थांबले होते.
शंतनू व सानिका स्कुटी गाडीजवळ आल्या नंतर जाधव लघुशंकेला बाजुला गेल्यावर गुनाट बाजुकडुन निमोणे बाजुकडे जाणा-या रोडने नविन मॉडेलच्या बोलेरो गाडीवरील अज्ञात चालकाने शंतनु सोमनाथ जाधव व सानिका सचिन कांबळे यांना जोरात धड़क दिली. त्यात गंभीर जखमी होवून शंतनुचा मृत्यू झाला तर सानिका कांबळे जखमी झाली आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून वाहनचालक पळून गेला. शंतनूच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक झेंडगे करीत आहे.