इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लखनऊ: एक हादरवून सोडणारी घटना घडलीय महिलेची तिच्या नवऱ्याने आणि मुलांनी गळा दाबून हत्या केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा महिलेचा शिरच्छेद झालेला मृतदेह आढळला. घटनास्थळी महिलेच शीर नव्हतं. तिच्या हाताची बोटं कापलेली होती. पोलिसांनी या प्रकरणात सर्व चारही आरोपींना अटक केलीय. पोलिसांनी सांगितलं की, महिलेचा दुसरा नवरा, सावत्र मुलगा आणि भाच्याने मिळून ही हत्या केली. त्यांनी कुऱ्हाडीने मृतदेहाचे तुकडे केले. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील मटौन्ध पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली. माया देवी असं मृत महिलेच नाव आहे. ती छतरपुरच्या पहरा येथे राहते.
27 सप्टेंबरला चमरहा येथे पोलिसांना मृतदेह सापडला होता. पोलिसांची एक टीम या प्रकरणी चौकशी करतेय. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मायाची दोन लग्न झाली होती. ती दुसरा पती राजकुमार सोबत राहत होती. दुसऱ्या नवऱ्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं होती. एकाच सूरज प्रकाश आणि दुसऱ्याच नाव छोटू आहे. पत्नी माया देवीचे सूरज प्रकाश सोबत अनैतिक संबंध होते, असा आरोप राजकुमारने केलाय. माया देवी दुसरा मुलगा बृजेशला सुद्धा अनैतिक संबंध ठेवण्यासाठी त्रास देत होती. संबंध ठेवले नाही, तर खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत होती. यालाच कंटाळून तिघांनी मिळून मायादेवीची हत्या केली.
तिला कल्पनाही आली नाही
महिलेचा पती राजकुमारने सूरज प्रकाश आणि भाचा उदयभान याच्यासाथीने मिळून मायादेवीला पिकअप व्हॅनमध्ये बसवले. आपल्यासोबत काही अघटित होईल, याची कल्पनाही मायादेवीला आली नाही. सेमरहा गावातील एका घनदाट जंगलात ते मायादेवीला घेऊन गेले. तिथे तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर कुऱ्हाडीने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. कोणाला ओळख पटवता येऊ नये, यासाठी तिचं मुंडक उडवलं, हाताची बोट कापली.