इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उत्तर प्रदेशः उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीला तिचा बॉयफ्रेंड एका हुक्का बारमध्ये घेऊन गेला होता. तेथे पीडितेवर तिच्या बायफ्रेंडसोबत 7 जणांनी तब्बल 7 दिवस सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे तर काही अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लालपूर-पाण्डेयपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हुकुलगंज येथे राहणारी तरुणी 29 मार्च रोजी बेपत्ता झाली. याबाबतची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत दिली होती. इन्स्टाग्रामवर तिची साजिद नावाच्या तरुणासोबत मैत्री झाली होती. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. या तरुणानेच तिची ओळख इतर तरुणांसोबत करून दिली. पीडित तरुणीचा बॉयफ्रेंड तरुणीला 29 मार्चला मलदहिया येथील एका हुक्का बारमध्ये घेऊन गेला. त्यानंतर तेथे त्याचे इतर मित्रही आले. त्यानंतर हुक्का बारमध्ये पीडित तरुणीच्या पेयामध्ये गुंगीचे औषध टाकले. त्यानंतर नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. हॉटेल वर नेऊन तब्बल 7 दिवस 7 तरुणांनी सामूहिक अत्याचार केला.
याप्रकरणी पोलिसांनी सातही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यामधील काही नराधमांना अटक केली आहे. तर काही आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.