Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजबॉम्बच्या साहित्यासाठी साताऱ्यात व्यापाऱ्याला लुटले; 'एटीएस'ची माहिती

बॉम्बच्या साहित्यासाठी साताऱ्यात व्यापाऱ्याला लुटले; ‘एटीएस’ची माहिती

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे – दहशतवादी कट रचल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या दोघांनी साताऱ्यातील साडी विक्री दुकानावर दरोडा टाकून एक लाख रुपयांची रोकड लुटली होती. या पैशातून त्यांनी बॉम्ब तयार करण्याचे साहित्य खरेदी केल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी ‘एटीएस’ने महंमद शहानवाज आलम खान ऊर्फ अब्दुल्ला ऊर्फ इब्राहिम (वय ३१, रा. झारखंड), महंमद युनूस महंमद याकू साकी ऊर्फ छोटू (वय २४, रा. रतलाम) आणि झुल्फिकार अली बडोदावाला ऊर्फ लाला ऊर्फ लालाभाई (रा. मुंबई) यांना अटक केली आहे.

सातारा महामार्गावरील अजंठा चौकातील गणपती सिल्क साडी सेंटरमध्ये आठ एप्रिल २०२३ रोजी रात्री नऊच्या सुमारास ही लुटमारीची घटना घडली होती. संशयितांनी एक लाख रुपयांची रोकड लुटली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments