Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजबॉडिबिल्डींग अन् सेक्स पॉवर वाढविण्यासाठी: वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनची बेकायदा खरेदी करणारी...

बॉडिबिल्डींग अन् सेक्स पॉवर वाढविण्यासाठी: वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनची बेकायदा खरेदी करणारी महिला जेरबंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बॉडिबिल्डींग आणि सेक्स पॉवर वाढविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनची बेकायदा खरेदी करणाऱ्या एका महिलेस स्वारगेट पोलिसांनी अटक केली. तीच्या ताब्यातून तब्बल 15 हजार 400 रुपयांची 46 इंजेक्शन हस्तगत करण्यात आली आहेत. या महिलेच्या एका अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले असून दुसरा अल्पवयीन साथीदार पसार झाला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रविण गोडसे यांनी तक्रार दिली आहे, त्यानूसार निकीता जाधव (23, रा. बिबवेवाडी) हिला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार स्वारगेट पोलिसांचे एक पथक एस.टी. स्थानकात गस्त घालत असताना त्यांना दोन मुले संशयास्पदरित्या उभी असलेली दिसली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, एक मुलगा घाबरुण पळून गेला. मात्र दुसऱ्याच्या सॅकची तपासणी केली असता, त्यामध्ये 46 इंजेक्शन आढळली.

ही इंजेक्शन आरोपी महिलेच्या नावाने पार्सल आली होती. त्यावर तीचा पत्ता आणि मोबाईल होता. मात्र संबंधीत महिलेकडे औषध खरेदीचा आणि विक्रीचा कोणताही परवाना नसताना तसेच बिलही नसताना तीने हे इंजेक्शन मागवले होते. मेफेनटरमाइन सल्फेट हे इंजेक्शन डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय घेता येत नाही.

या इंजेक्शनच्या वापरामुळे जीवीतास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच त्याचे दुष्परिणामही मोठे आहेत. मात्र संबंधीत महिलेकडे औषध खरेदीचा आणि विक्रीचा कोणताही परवाना नसताना तसेच बिलही नसताना तीने हे इंजेक्शन मागवले होते. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले करत आहेत.

चौकट : सेक्स पॉवर वाढवण्यासाठी आणि जिममध्ये अधिक जोमाने व्यायाम करण्यासाठी मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनचा कॉलेजमधील तरुणी आणि तरुण वापर करतात. संबंधीत आरोपी महिला अगोदर दोन ते तीन जीममध्ये रिशेप्शनम्हणून काम करत होती. यामुळे तीला इंजेक्शन बद्दल माहिती होती. तीने ही इंजेक्शन विक्री करण्यासाठी आणली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments