Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज बेशिस्त दुचाकीस्वारांची मस्ती तरूणाच्या जीवावर बेतली: दुभाजकाला धडकून तरूण ठार, तिघे जखमी;...

बेशिस्त दुचाकीस्वारांची मस्ती तरूणाच्या जीवावर बेतली: दुभाजकाला धडकून तरूण ठार, तिघे जखमी; पुण्यातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बेशिस्त दुचाकीस्वारांची मस्ती तरूणाच्या जीवाशी आली आहे. बेदरकारपणे दुचाकी चालवून दुभाजकाला धडकल्याने एकाचा जीव गेला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. त्यासोबतच दुसऱ्या दुचाकीस्वाराने अचानकपणे ब्रेक दाबल्यामुळ दुचाकी घसरल्याने दोघेही गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात सुमारास कर्वे रस्त्यावरील कॅनेरा बँकेसमोर झाला. सुयश राजेंद्र इंडिस (वय २१ रा. कर्वेनगर, पुणे) असे मयत झालेल्याचे नाव आहे. तर साहिल गुप्ते, पीयुष गायके, उज्वल अहिरे अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयुश आणि त्याचा मित्र उज्वल अहिरे एका दुचाकीवर प्रवास करीत होते. तर सुयश आणि साहिल दुसऱ्या दुचाकीवरून जात होते. २८ जानेवारीला मध्यरात्री तीनच्या सुमारास दोघेही दुचाकीस्वार रस्त्याने जात होते. त्यावेळी सुयशने बेदरकारपणे दुचाकी चालविल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी दुभाजकाला धडकून सुयशचा मृत्यू झाला. तर साहिल गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर पीयुशने दुचाकीचा अचानकपणे ब्रेक दाबल्यामुळे गाडी घसरून दोघेही खाली पडले. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक करिश्मा शेख पुढील तपास करीत आहेत.

रिक्षाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

जुना बाजार येथील वीर संताजी घोरपडे पथ या सार्वजनिक रस्त्यावर पायी चालत जात असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकास रिक्षा चालकानी भरधाव वेगात धडक दिल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. काळुराम बळी कांबळे (वय-65, राहणार – मंगळवार पेठ, पुणे) असे मयत इसमाचे नाव आहे. या प्रकरणी रिक्षा चालक विकी गायकवाड ( राहणार – मंगळवार पेठ, पुणे) याच्यावर फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत यांचा मुलगा धनराज काळूराम कांबळे (वय 36 ) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदर रिक्षा चालकानी त्याच्या ताब्यातील निरीक्षक अविचाराने हायगायीने, बेदारकपणे चालून तक्रारदार यांच्या वडिलांना धडक देऊन त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला आहे.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments