Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजबीडमधील वडवणीजवळ भरदुपारी उल्कापात; तहसील प्रशासनाने दगड ताब्यात घेतले

बीडमधील वडवणीजवळ भरदुपारी उल्कापात; तहसील प्रशासनाने दगड ताब्यात घेतले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

वडवणी (बीड): दुपारची वेळ, आकाशात प्रचंड मोठा आवाज झालाआणि त्यानंतर काही क्षणातच आकाशातून घरावर दगड पडल्याची घटना सोमवारी खळवट लिमगाव (ता. वडवणी) येथे घडली. यानंतर तहसील प्रशासनाने तातडीने भेट देऊन पाहणी केली. यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम विद्यापीठाचे भू-वैज्ञानिक शास्त्रज्ञ यांच्या टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. हा उल्कापात असावा असा अंदाज आहे.

वडवणी तालुक्यातील खवळट लिमगाव येथे सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आकाशामध्ये तीन मोठे आवाज होऊन आकाशामधून दगड कोसळले आहेत. घरावर पड़लेला दगड हा वेगळा असल्याचे भवकऱ्यांनी सांगितले. तसेच दगड ज्यावेळी घरावर पडला, त्यावेळी हा दगड खूप गारं असल्याचेही सांगण्यात आले. घटनास्थळी वडवणी तहसील प्रशासनाने भेट देऊन हा नेमका दगड कुठून आणि कसा पडला याची माहिती गावकऱ्याकडून घेतली, तसेच पंचनामा केला आहे.

एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरचे अभ्यासक श्रीनिवास औंधकर, अभिनव विटेकर यांच्या टिमने भेट देत पाहणी केली. हा आवाज़ कशामुळे झाला, दगड पडण्याचे कारण काय? याचे गूढ काय ते लवकरच कळवू, अशी माहिती शास्त्रज्ञांनी दिली आहे. हा एक दगड तहसीलदार यांच्याकडून घेतला आहे. तर यातील एक दगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आकाशामध्ये तीन मोठे आवाज होऊन आकाशामधून दगड कोसळले आहेत. यातील एक दगड भिकाजी अंबुरे यांच्या घरावर पडला. हा दगड इतक्या वेगाने पडला की घरावरील पत्रा तुटून हा दगड खाली पडला. तसेच अन्य दोन दगड शेतामध्ये पडले, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments