इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : देहू नगरीत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी वारकऱ्यांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. भाविकांना इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे तसेच पाणी वापरण्यास देखील मनाई केली आहे. 14 ते 16 मार्च दरम्यान होणाऱ्या या पवित्र सोहळ्याला हजारो वारकरी इंद्रायणी नदीत स्नान करतात आणि हेच पाणी पवित्र म्हणून ग्रहण करतात. मात्र यंदा नदीतील पाणी पिण्यास तसेच स्वयंपाकासाठी वापरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम आजार दुषित पाण्यामुळे पसरल्याची प्राथमिक माहिती आहे. या पार्श्वभूमीवर तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे महत्त्वाचे आदेश दिले आहेत. भाविकांना इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई केली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचं सदेह वैकुंठ गमन झालं त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.. या निमित्ताने राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी देहुत दाखल होत आहेत. या भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी प्रशासन अलर्ट मोडवर आले असून इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास सक्ती करण्यात आली आहे.
शहरात वाढणाऱ्या जीबीएसच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांना इंद्रायणी येथील पाणी वापरण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश दिले आहेत.