इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः पुणे शहरातील बिबवेवाडी भागातील अपर इंदिरानगर, आई माता मंदिर, अप्पर डेपो, सोळा एकर, दुर्गामाता गार्डन, तय्यबा मस्जिद मेन रोड, सुवर्ण मित्र मंडळ, राजीव गांधी नगर, परिसरातील अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांची हातात धारदार शस्त्र घेऊन तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन दहशत माजवलेल्या परिसरात नेऊन त्यांची धिंड काढली आहे.
अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील बिबवेवाडी भागातील अपर इंदिरानगर, आई माता मंदिर, सुवर्ण मित्र मंडळ, राजीव गांधी नगर, परिसरातील अनेक चारचाकी, दुचाकी वाहनांची हातात धारदार शस्त्र घेऊन तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शहरातील बिबवेवाडी परिसरातील अप्पर इंदिरानगर परिसरातील दुर्गा माता मंदिर परिसरात मध्यरात्री एका टोळक्याने दांडक्या ने रस्त्याच्या कडेला लावलेली दुचाकी, टेम्पो आणि रिक्षांची तोडफोड केली आहे. आणि शिवीगाळ करत दहशत निर्माण केली. वाहन तोडफोडीचा आवाज ऐकल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केली.
त्यांनंतर टोळके तेथून पसार झाले.
ज्या ठिकाणी आरोपींनी अनेक गाड्यांची तोडफोड केली आहे त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांची दहशत कमी करण्यासाठी आरोपींची धिंड काढली आहे. तीन आरोपींना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात ज्या टोळक्याने वाहनांची तोडफोड केली आहे ते दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. सदरील घटनेची माहिती बिबवेवाडी पोलिसांना मिळताच त्वरित घटनास्थळी पोहचले. पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.