इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नारायणगाव : जुन्नर तालुक्यात एका तरुणावर बिबट्याने हल्लाकेळ्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून चाललेल्या तरुणाच्या दुचाकीवर झडप घालून पाठीमागे बसलेल्या युवकाला बिबट्याने जखमी केले आहे. हि घटना जुन्नर तालुक्यातील रोहोकडी येथे गुरुवारी (दि.६) रात्री ८ वाजता घडलीय आहे. साहिल डोंगरे (वय १९, रा. उदापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप कुलवडे व साहिल डोंगरे हे ओतूर वरून रोहोकडी येथील महालक्ष्मीरोड ते गावठाण रस्त्यावरून मोटार दुरूस्तीसाठी जात असताना आढपांधी येथील शांताराम मुरादे यांच्या घराजवळ रस्त्याच्याकडेला असलेल्या ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवर हल्ला केला. मागे बसलेल्या साहिल लक्ष्मण डोंगरे (वय १९) रा. उदापूर याला जखमी केले आहे. याचवेळी मागून आलेल्या दुचाकीवरील तरुणांनी व स्थानिकांनी आरडा ओरड केल्याने बिबट्या पळून गेला.
या घटनेची माहिती मिळताच वनविभाग वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर लहू ठोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रूपाली जगताप, वैभव वाजे, फुलचंद खंडागळे व टीमने घटनास्थळी येऊन डोंगरे यास तात्काळ ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून प्राथमिक उपचार केले आणि पुढील उपचारासाठी नारायणगाव येथे रवाना केले आहे. रोहोकडी येथे हल्ला आलायडर मशीन बसविण्यात आली आहे. रिस्को टीम या भागात गस्त घालणार असल्याचे वनविभागाने म्हटले आहे.