Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजबिग बॉसचे नवे पर्व 'या' तारखेपासून होणार सुरू; नव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार...

बिग बॉसचे नवे पर्व ‘या’ तारखेपासून होणार सुरू; नव्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई: बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. प्रेक्षकांसाठी लवकरच बिग बॉस मराठीचे नवे पर्व सुरू होणार आहे. यावेळच्या बिग बॉसमध्ये कोणता नवा चेहरा असणार? याची प्रेक्षकांना आतुरता आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राची प्रतीक्षा संपणार आहे. कारण आता बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली आहे.

बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार?

या फेब्रुवारी महिन्यातच बिग बॉस मराठीचे नवे पर्व सुरू होणार आहे. याबाबत कलर्स मराठीने नव्या पर्वाची अधिकृतपणे घोषणा केली आहे. बिगबॉसच्या नव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी परत अभिनेता रितेश देशमुख याच्यावरच सोपवण्यात आली आहे. रितेशने देशमुखने नुकतेच झालेले बिगबॉसचे पर्व चांगलेच गाजवले होते. त्यामुळे आताही नव्या पर्वात रितेश देशमुख आपल्या सूत्रसंचालणाची चुणूक दाखवणार आहे.

बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला सुरुवात ‘कधी’ होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, बिग बॉस मराठीच्या नव्या पर्वाला येत्या 10 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम दररोज दुपारी तीन वाजता कलर्स मराठी या वाहिनीवर प्रसारीत केला जाणार आहे. यात एक विशेष बाब अशी की, बिगबॉसच्या आधीच्या पर्वाप्रमाणे यावेळी बिग बॉस मराठी जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधीही पाहता येईल.

या वेळच्या नव्या पर्वात सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर, यू-ट्यूबर्स आणि सिने क्षेत्रातील कलाकार सहभागी होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments