Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजबालगंधर्व रंगमंदिराने टाकली कात ; देखभाल-दुरुस्तीच्या कामांसह नव्या सुविधांचाही अंतर्भाव

बालगंधर्व रंगमंदिराने टाकली कात ; देखभाल-दुरुस्तीच्या कामांसह नव्या सुविधांचाही अंतर्भाव

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : प्रेक्षागृहातील ‘रेड कार्पेट’, आकर्षक प्रकाशयोजना, आसनव्यवस्थेला मिळालेली चकाकी अशा बदललेल्या रूपात बालगंधर्व रंगमंदिर खुले झाले आहे. देखभाल-दुरुस्तीच्या कामांसह नव्या सुविधांचाही अंतर्भाव करण्यात आल्याने ‘बालगंधर्व’ने जणू कात टाकली आहे.

डागडुजीच्या कामांसाठी हे नाट्यगृह गेले सुमारे महिनाभर बंद होते. प्रशासनाने शब्द पाळत वेळेत हे काम पूर्ण करत गुरुवारपासून (ता. २८) नाट्यगृह खुले केले. या वेळी नाट्यगृहाचा झालेला कायापालट पाहून कलाकार आणि रसिकांनाही सुखद धक्का बसला. वर्षभरापूर्वीच डासांचा उच्छाद, बिघडलेली वातानुकूलन यंत्रणा, अस्वच्छतेचे साम्राज्य यांमुळे रंगमंदिराची रया गेली होती. मात्र ‘सकाळ’ने या नाट्यगृहांच्या समस्यांबाबत पाठपुरावा केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला या समस्या लवकरात लवकर दूर करण्याचा आदेश दिला होता.

प्रशासनाने सर्वप्रथम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे काम हाती घेऊन तेथील देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यानंतरच्या टप्प्यात बालगंधर्व रंगमंदिरासह स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच आणि औंधच्या पं. भीमसेन जोशी कलामंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. बालगंधर्व रंगमंदिर आणि पं. भीमसेन जोशी कलामंदिर येथील काम पूर्ण झाले आहे.

‘बालगंधर्व’ मधील नवे बदल

• वातानुकूलन यंत्रणेची संपूर्ण दुरुस्ती

• वातानुकूलन यंत्रणेचा रंगमंचापर्यंत विस्तार

• काही खुर्चा बदललेल्या, तर काही खुर्त्यांना नवी कव्हर

• व्हीआयपी कक्षाची पुनर्रचना

• रंगमंचावरील पडदा आणि विगांची दुरुस्ती

• प्रकाशयोजना आकर्षक करण्यासाठी बदल

• प्रेक्षागृहातील खुर्थ्यांमध्ये

• ‘रेड कार्पेट’

• खुर्थ्यांच्या बाजूला उजेडासाठी साइड लॅम्प

बालगंधर्व रंगमंदिर हे पुण्यातील अतिशय महत्त्वाचे नाट्यगृह आहे. काही तक्रारी या नाट्यगृहात जाणवत होत्या, त्या दूर करून नाट्यगृहाचा कायापालट केल्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो. त्याचवेळी या झालेल्या सुधारणांची व्यवस्थित देखभाल व्हावी, अशी अपेक्षाही व्यक्त करतो. नाट्यकर्मी आणि रसिकांनीही नाट्यगृहात स्वच्छता राखली जाईल, याची काळजी घ्यावी.

– वैभव मांगले, अभिनेते

बालगंधर्व रंगमंदिरात आजवर फार मोठ्या प्रमाणात देखभाल- दुरुस्तीचे काम झाले नव्हते. हे काम पहिल्यांदाच झाले. आत्ता केलेले काम दीर्घकाळ टिकेल. रसिकांना नाट्यगृहात उत्तम अनुभव मिळेल, यादृष्टीने आम्ही प्रयत्न केले आहेत. तसेच त्यांच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी प्रथमच क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments