इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
सोलापूर : दारूच्या नशेत एका पतीने पत्नीला बेदम मारहाण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना बार्शी तालुक्यातील शेलगाव येथे घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पत्नीच्या विरहातून सकाळी पतीनेही टोकाचे पाऊल उचलत बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वसंत पवार आणि आयनाबाई उर्फ सोनबाई वसंत पवार असं मृत पावलेल्या दाम्पत्याचं नाव आहे. वसंत पवार यांना दारूचे व्यसन असल्यामुळे दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायची. दरम्यान मंगळवारी रात्री दारू पिऊन आल्यानंतर वसंत पवार यांनी पत्नी सोनाबाई आणि वडील अंबादास यांना किरकोळ कारणावरून लाकडी दांडक्याने मारहाण केली. दारूच्या नशेत असणाऱ्या वसंत पवार यांनी रागाच्या भरात पत्नीला एवढ्या जोरात मारहाण केली की पत्नीचा जागीच मृत्यू झाला. रात्री घडलेल्या या घटनेने बार्शीतील शेलगावात मोठी खळबळ उडाली. मृत पडलेली पत्नी आणि वेदनेने विवळत असलेले वडील पाहून वसंत पवार यांना धक्का बसला आणि त्यांनी तिथून पळ काढला.
दरम्यान आपलं काही खरं नाही असा अंदाज येताचं वसंत पवार यांनी सकाळी घरासमोरील बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाल आहे. वैराग पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.