Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजबारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार समर्थकांमध्ये रंगतय सोशल...

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार समर्थकांमध्ये रंगतय सोशल मिडीया युध्द

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोकसभा निवडणूकीचा बिगुल वाजल्यानंतर आता बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार समर्थकांमध्ये जोरदार सोशल मिडीया युध्द रंगताना दिसत आहे.

अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी काटेवाडीत केलेल्या भाषणाला अजित पवार समर्थकांनी आज सूज्ञ बारामतीकरांचे मत या पत्राद्वारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. या मध्ये सहानुभूतीच्या नव्हे तर विकासाच्या मागे बारामतीकर उभे राहतील असे नमूद करण्यात आले आहे.

हे पत्र सोशल मिडीयावर फिरताच काही वेळातच स्वाभिमानी बारामतीकरांचे मत अशा आशयाचे एक पत्र व्हायरल झाले. या मध्ये स्वाभिमानी 99 टक्के जनता पवारसाहेबांच्या पाठीशी आहे तर हे मत सूज्ञ बारामतीकरांचे नसून लाभार्थी बारामतीकरांचे आहे, असे नमूद केले आहे.

दरम्यान काही व्हॉटसअँप ग्रुपवर दोन्ही समर्थकांमध्ये जोरदार वाकयुध्दही झालेले पाहायला मिळाले. दोन्ही गटांकडून परस्परांविरोधी पोस्ट टाकण्यासह काही व्हिडीओही शेअर केले जात आहे. उत्तराला लगेचच प्रत्युत्तर असे चित्र मंगळवारी (ता. 19) दिवसभर सोशल मिडीयावर पाहायला मिळाले.

ज्या ग्रुपमध्ये जे समर्थक आहेत ते तातडीने अशा पोस्टवर प्रतिक्रीया नोंदविताना दिसत आहेत. विविध आशयाचे लिखाण व आपल्या नेत्यांच्या मागे आपण खंबीरपणे उभे आहोत हे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते दाखवून देत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments