Saturday, July 12, 2025
Homeक्राईम न्यूजबारामती-पाटस पालखी महामार्गावर मोठा अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू; दुचाकी स्वाराचे धड...

बारामती-पाटस पालखी महामार्गावर मोठा अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू; दुचाकी स्वाराचे धड अन् शीर झाले वेगळे…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामती : राज्यात गेल्या काही दिवसांपासून, अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, या अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. नुकताच बारामती पाटस पालखी महामार्गावरती एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भयंकर होता की, एका दुचाकीस्वराचे शीर उडून दुसऱ्या बाजूला पडले.

बारामती-पाटस मार्गावरील शिर्सुफळ फाट्यावर हा अपघात घडला आहे. अमित लक्ष्मण लगड (रा. गोपाळवाडी, ता. दौंड) आणि विशाल रामचंद्र कोकरे (वय ३४, रा. धुमाळवाडी पणदरे, ता. बारामती) अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बारामती-पाटस मार्गावरील शिर्सुफळ येथे कार आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत कार चालक व दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी स्वाराचं धड आणि शीर वेगळं झालं होतं, तर कार मध्ये घुसलेली दुचाकी अक्षरशा क्रेनने ओढून बाहेर काढावी लागली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments