इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
बारामती, (पुणे) : सोरटेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायत हद्दीतील विद्युत पोलवर बल्ब लावताना एकाचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. 13) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून याप्रकरणी करंजेपूल (ता. बारामती) येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास चंद्रकांत कांबळे (रा. होळ गावठाण, ता. बारामती) असे करंट लागून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सागर माणिक बांदल (रा. करंजेपूल, ता. बारामती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सुरज सोमनाथ पाटोळे यांनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज पाटोळे, विकास कांबळे, निलेश भिसे, अमर होळकर, हे चौघेजण मिळेल त्या ठिकाणी इलेक्ट्रीशनची कामे करीत आहेत. विकास कांबळे याने सांगितले की, सोरटेवाडी गावातील सागर बांदल याने आपल्याला सोरटेवाडी गावठाण गावात इलेक्ट्रीक खांबावर बल्ब बसविण्याचे काम दिले असून प्रत्येकी पोलचे 100 रुपये देणार आहे. तेव्हा तु कृष्णा भिसे, अमर होळकर असे मिळून आपण सर्वजण काम करू.
सोरटेवाडी ग्रामंपचायत येथे गेलो. तेव्हा विकास कांबळे याने सागर बांदल ग्रामपंचायत कामगार याचे बरोबर ओळख करून दिली व एका दुकानातील लागणारे साहित्य घेण्यास सांगितले. शुक्रवारी सकाळी ग्रामपंचायत मध्ये बल्ब टेस्टींग केले. त्यानंतर सागर बांदल याने सांगितल्याप्रमाणे 3 डी पी चे फ्युज काढून घेतले.
त्यांनतर चौघेजण सौरटेवाडी गावठाण मध्ये बाळासाहेब जयंवत हरपळे यांचे घराच्याजवळ विकास कांबळे हा ज्या पोलवर बल्ब बसवित असताना पोलवरून अचानक खाली जमिनीवर कोसळला. त्यावेळी तिघेजण त्याच्याकडे पळत गेलो. त्याला तात्काळ बारामती येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शॉक बसल्याने मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, सोरटेवाडी गावात 4 जीपी आहेत असे सागर माणिक बांदल याने न सांगता 3 डी पी आहेत असे सांगितले. विकास चंद्रकांत कांबळे याचे मृत्युस सागर माणिक बांदल हा जबाबदार असल्यामुळे त्यांच्याविरुद्ध वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.