Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजबारामती एमआयडीसीत भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

बारामती एमआयडीसीत भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामती – येथील एमआयडीसी मधील समर्थ एंटरप्राईजेस या कंपनीतील स्क्रॅप सामानाला आज (ता. 9) दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली.

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. एमआयडीसी सह अग्निशमन दलाच्या विविध गाड्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. संध्याकाळी सात वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.

यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी कंपनीच्या मालाचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. उन्हाच्या तीव्रतेने आग लागली असण्याची शक्यता स्थानिक उद्योजकांनी व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments