इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः महाराष्ट्र विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाची पहिली यादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. आज (दि. २४) पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. दरम्यान ही पहिली यादी असून दुसरी यादी उद्या किंवा पुढील दोन दिवसांमध्ये दुसरी जाहीर करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील शिरूर-हवेलीमधून आमदार अशोक पवार, तर हडपसर मतदारसंघातून प्रशांत जगताप रिंगणात असणार आहेत. तसेच बारामतीमधून युगेंद्र पवार रिंगणात असतील. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच आंबेगावमधून देवदत्त निकम हे शड्डू ठोकणार आहेत. मुंब्रा कळवा मतदारसंघातून आमदार जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.