Tuesday, December 3, 2024
HomeUncategorizedबारामतीमध्ये जोरदार राडा ! घड्याळाच्या स्लीपचं वाटप, कार्यकर्त्यांना धमक्या; अजितदादांवर संतापत शर्मिला...

बारामतीमध्ये जोरदार राडा ! घड्याळाच्या स्लीपचं वाटप, कार्यकर्त्यांना धमक्या; अजितदादांवर संतापत शर्मिला वहिनींनी डोक्यावर घेतलं मतदान केंद्र

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामती : बारामतीमध्ये मतदान केंद्रावर जोरदार राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला आहे. मतदारांना घडाळ्याचे शिक्के असलेल्या स्लीप वाटण्यात येत आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडे आम्ही याची तक्रार करणार असल्याचे शर्मिला पवार यांनी सांगितले. शर्मिला पवार मतदान करण्यासाठी बारामती येथील मतदारसंघात गेल्या होत्या, त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर हा आरोप केला आहे.

पुढे बोलताना शर्मिला पवार म्हणाल्या, मतदान केंद्रावरती आमच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून धमकी देण्यात आली आहे. मतदारांकडे चिठ्ठ्या असून त्यावर शिक्के मारून आत सोडलं जात आहे. इतर ठिकाणी बूथवर फिरत होते. तेव्हा आमच्या कार्यकर्त्याला धमक्या आल्या. मी संपवतो, तुला खल्लास करतो अशी भाषा इथं सुरू आहे. हवं असेल तर तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासा असं देखील त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

बारामतीमधील महात्मा गांधी बालक मंदिर या मतदारसंघामध्ये हा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. या गोंधळानंतर स्वतः अजित पवार तिथे आले आहेत. मला माझ्या कार्यकर्त्यांवर विश्वास असून शर्मिला पवार खोटे आरोप करत आहेत. बोगस मतदानाची निवडणूक आयोग तपास करतील. तक्रारीमध्ये काही तथ्य असायला हवे, उलट माझ्या पोलिंग एजंटला बाहेर काढलं आहे. आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून निवडणूक लढवत आहोत. आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रात राहतो, आमच्या कार्यकर्ते असं करणार नसल्याचंही अजित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

दरम्यान, संपूर्ण देशाचे लक्ष बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे लागले आहे. या मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात सरळ लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काट्याची लढाई पाहायला मिळाली होती. त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत आहे. पवार घरामधील दुसरी प्रतिष्ठेची लढत होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments