Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजबारामतीमध्ये अजितदादांना धक्काः शरद पवारांचे हात बळकट करण्याचे युगेंद्र पवारांनी केले ...

बारामतीमध्ये अजितदादांना धक्काः शरद पवारांचे हात बळकट करण्याचे युगेंद्र पवारांनी केले आवाहन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सख्खा पुतण्या शरद पवारांसोबत निवडणुकीच्या रिंगणात प्रचाराला उभा राहणार आहे. अजितदादाचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या शहर कार्यालयाला भेट देणार आहेत. शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी शहर कार्यालयाला उपस्थित राहण्याचे आवाहन युगेंद्र पवार यांनी केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार भाजपसोबत घरोबा करत सत्तेत सामील झाले.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळाले. मात्र अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा पवार कुटुंबाला पटलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. दोनच दिवसापूर्वी अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितले होते की माझं कुटुंब सोडून इतर कुणीही माझ्या कुटूंबातील माझा प्रचार करणार नाही. त्यानंतर आता युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सामील होत असल्याने अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

अजित पवारांचे ज्येष्ठ बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार शरद पवारांच्या गटातून राजकारणात एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. एकीकडे अजित पवारांविरोधात रोहित पवारांनी युवा संघर्ष यात्रा काढून घेरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता दुसरा पुतण्या तो ही सख्खा उभा ठाकणार असल्याच्या चर्चानी राज्यातील राजकारणात आणखी एक ट्विस्ट पहायला मिळणार आहे.

कोण आहेत युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र आहेत. युगेंद्र यांच्या मातोश्री शर्मिला पवार या गेल्या अनेक वर्षांपासून शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून बारामती व इंदापूर तालुक्यामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. युगेंद्र पवार राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कारण ते गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीतील विविध सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळतात.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments