Saturday, July 13, 2024
Homeक्राईम न्यूजबारामतीत खळबळ...! गंजलेल्या अवस्थेत सापडले पाच पिस्तूल; तपास सुरु

बारामतीत खळबळ…! गंजलेल्या अवस्थेत सापडले पाच पिस्तूल; तपास सुरु

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामती : बारामती शहरातील महात्मा फुले साठवण तलावानजीक पाच गंजलेल्या अवस्थेत पाच पिस्तुले आढळून आले आहेत. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

अज्ञात व्यक्तीने साठवण तलावानजीक पाच पिस्तुले टाकून दिली असल्याची माहिती बारामती शहर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संतोष घोळवे व इतर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गंजलेल्या अवस्थेतील पाच पिस्तुले ताब्यात घेतली आहेत. ही पिस्तुले नेमकी कोणी या ठिकाणी आणून टाकली व ही कोणाच्या मालकीची आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

एकाच वेळेस गंजलेल्या अवस्थेतील पाच पिस्तुले कोणी या ठिकाणी आणून टाकले असतील, या दृष्टीने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या घटनेला पोलीस विभागाने गांभीयनि घेतले असून त्याचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षात बारामातीमधून पोलिसांनी अनेक तरुणांकडून बेकायदा गावठी कट्टे आणि पिस्तूल जप्त केलेले आहेत. मध्य प्रदेशामधून अतिशय कमी किमतीमध्ये ही शस्त्रे मिळत असल्याची पोलिसांची माहिती आहे. काही एजंट या परिसरात येऊन पिस्तुलांची विक्री करतात, अशी माहिती पोलिसांकडे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments