Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजबारामतीत आम्ही दडपशाहीवाले नाही तर लोकशाही माननारेः खासदार सुप्रिया सुळे यांचे मत;...

बारामतीत आम्ही दडपशाहीवाले नाही तर लोकशाही माननारेः खासदार सुप्रिया सुळे यांचे मत; म्हणाल्या – मंत्री चंद्रकांत पाटलांची संपवण्याची भाषा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मंत्री चंद्रकांत पाटील बारामती मध्ये येऊन म्हणतात की, आम्ही बारामती मधून शरद पवारांना संपविण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे ही संपविण्याची भाषा आमच्याकडे नाही. आम्ही दडपशाहीवाले नाही तर लोकशाही माननारे आहे. लोकशाहीत कोणाला संपविण्यासाठी आम्ही राजकारण करत नाही तर सामान्य नागरिकांचे आयुष्यात चांगला बदल घडविण्यासाठी राजकारण करत आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सुळे म्हणाले, मी मागील तीन महिने सांगत आहे की, बारामती व पुणे जिल्हयात अनेक भागात पाण्याचा गंभीर प्रश्न बनला अाहे. प्रशासनाने अाम्ही उपाय करु सांगितले परंतु काही केले नाही. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकार काही प्रयत्नशील नाही. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम व भटक्या विमुक्त समाजाची जे सत्ताधारी अाहे त्यांनी वेळोवेळी फसवणुक केली अाहे.

अनेक वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी सदर समाजाचे घेऊन अाश्वासने दिली परंतु पूर्तता कोणती केली नाही. दुष्काळ, अारक्षण, बेरोजगारी, महागाई बाबत सरकार असंवेदनशील अाहे. निवडणुक अाल्याचे कारण देत ते पळवाट काढत अाहे. या मुद्द्यांवर सरकारने सकारात्मक पाऊल उचलणे गरजेचे अाहे. भाजप केवळ निवडणुक लढणे, पक्ष फोडणे, घरे फोडणे, ईडी-सीबीअाय- अायकर विभाग मदतीने छापेमारी करणे यामध्ये गुंतलेले अाहे. प्रशासनाकडे लक्ष्य देण्यास त्यांना वेळ नाही.

राज्यात पोलीस भरतीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या उमेदवारांवर अन्याय करण्याचे काम राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार करत अाहे. शेतकरी अस्वस्थ अाहे परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात अाहे. राज्यसरकारला विनंती केली होती की, जलजीवन मीशनची श्वेतपत्रिका काढा मागणी केली होती परंतु त्याबाबत सरकार काही बोलत नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चुकीचे पध्दतीने अटक करुन त्यांच्यावर अन्याय करण्यात आला आहे. ताकदीने आम्ही केजरीवाल व आम आदमी पक्षाचे पाठीशी संकटाचे काळात अाहे.

अपप्रचार करणे योग्य नाही

सुळे म्हणाल्या, पुण्याचे अाघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या अल्पशिक्षणाचा मुद्दा भाजपने उचलला त्याबाबत सुळे म्हणाल्या, कोणी किती शिक्षण घेतले हे महत्वाचे नाही. राज्याचे अनेक मोठे नेते राजकारणात स्वतःचा ठसा उमटून गेले. लोकांच्या मनात जे नेते अाहे त्यांच्याबाबत अशाप्रकारे अपप्रचार करणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्ती लोकशाही वाचवणे व संविधान रक्षणासाठी निवडणुकीत काम करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments