Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज बारामतीच्या जनाईचा पाणी प्रश्न पेटला; सुप्रिया सुळेंसमोर शेतकऱ्यांनी मांडला समस्यांचा पाढा

बारामतीच्या जनाईचा पाणी प्रश्न पेटला; सुप्रिया सुळेंसमोर शेतकऱ्यांनी मांडला समस्यांचा पाढा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सुपे : बारामती तालुक्यातील सुपे परगण्याला जीवदान देणारी जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या हक्काचा पाणी प्रश्न पेटला आहे. या भागाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समोर शेतकऱ्यांनी जनाई योजनेतील तृटींचा पाढा वाचला. यावर तातडीने तोडगा न निघाल्यास येत्या २६ जानेवारीला आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुपे येथील माऊली मंदिरात जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या हक्काच्या पाणी प्रश्नासंबंधीची बैठक खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी शेतकरी संघर्ष कृती समितीच्यावतीने पाण्याचे एक वर्षाचे नियोजन करुन तीन टप्यात पाणी देण्याची मागणी करण्यात आली. तसेच या योजनेद्वारे गेल्या ३० वर्षात २० टक्के शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. ही योजना सुरु झाल्यापासुन आंबी, चांदगुडेवाडीचा काही भाग, शेरेवाडी, बाबुर्डी, काहाटी आणि जळगाव सुपे आदी गावांचा बहुतांश शिवार ओलिताखाली आलेला नाही. त्यामुळे आमच्या हक्काचे २ हजार १७० एमसीएफटी पाण्याचे तीन टप्यात वाटप करावे. तसेच पावसाळ्यात नद्यांना ओव्हर फ्लो होणारे पाणी लाभधारक शेतकऱ्याना मिळावे. येथे जलसंपदाचे ऑफिस व्हावे अशा एकुण प्रमुख १२ मागण्याचे निवेदन खासदार सुळे यांच्याकडे देण्यात आले.

यावेळी शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष पोपट खैरे, अॅड. दत्तायय बोरकर, ज्ञानेश्वर कौले, महादेव भोंडवे, कालिदास भोंडवे आदींनी जनाई मध्ये असलेल्या तृटींबाबत सवुस्तर माहिती दिली. यावेळी शिरसाई उपसा योजनेचे उपोषणकर्ते व माजी सरपंच विठ्ठल जराड यांनी जलसंपदा आणि महापालिका यांच्याविरोधात उच्च न्यायालयात हक्काच्या पाण्याबाबत दावा दाखल करणार असल्याचे सांगितले.

दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी अतुल कपोले यांच्याशी फोन द्वारे माहिती दिली. यावेळी जनाईचा प्रश्न त्वरित सोडवण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी कपोले यांनी येत्या २३ जानेवारी पर्यत शेतकऱ्यांची बैठक घेवु. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत प्रयत्न करु असे सुळे यांना सांगितले. मात्र शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन जलसंपदा अधिकाऱ्यांनी सुप्यात येवुन आमचे प्रश्न मार्गी लावावेत यावर शेतकरी ठाम आहेत. तोडगा न निघाल्यास २६ जानेवारी पासुन हक्काच्या पाण्यासाठी आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे पत्र सुळे यांना यावेळी देण्यात आले.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments