Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजबाबा सिद्दीकी हत्या प्रकरण; पुण्यातून आणखी एकास अटक

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण; पुण्यातून आणखी एकास अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. या हत्येप्रकरणी पुण्यातून आणखी एका आरोपीला अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणातील 16 वी अटक आहे.

गौरव आपुणे (वय-23) या आरोपीस पुण्यातून बुधवारी (दि.06) रोजी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणा-या आरोपी गौरव आपुणेचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आल्याचे गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिका-याने स्पष्ट केले आहे. या हत्येप्रकरणाची माहिती आरोपी गौरव आपुणेला होती तसेच तो या हत्येच्या कटात सहभागी असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी आतापर्यंत सहा पिस्तुल जप्त करण्यात आले आहेत.

दरम्यान, बाबा सिद्दिकी यांची 12 ऑक्टोबर रोजी त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांची टीम वेगवेगळ्या राज्यात जावून धागेदोरे तपासत आहे. या हत्येची जबाबदारी जरी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असली तरी पोलीस वेगवेगळ्या अँगलने तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments