Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज बाबांसोबतचं नातं कॉम्प्लिकेटेड'; आमिर खानची मुलगी असं का म्हणाली ?

बाबांसोबतचं नातं कॉम्प्लिकेटेड’; आमिर खानची मुलगी असं का म्हणाली ?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 20 ऑक्टोबर 2023 : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान नेहमीच तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. आयराने विविध मुलाखतींमध्ये तिच्या मानसिक आरोग्याविषयी खुलासा केला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती पालकांसोबतच्या नात्याबद्दल व्यक्त झाली. माझे आईवडील नेहमीच माझ्या कठीण काळात सोबत होते, पण त्यांच्यासमोर मोकळेपणे बोलणं कठीण होतं, असं आयरा म्हणाली. नैराश्यातून बाहेर पडण्याच्या मार्गातील हा सर्वांत मोठा अडथळा सुरुवातीच्या काळात निर्माण झाल्याचं तिने सांगितलं.

‘लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिरने 2022 पासून काही काळ ब्रेक घेतला. करिअरच्या मागे धावताना कुटुंबीयांसोबत पुरेसा वेळ घालवता आलाच नाही, अशी खंत त्याने व्यक्त केली होती. लहानपणी तुला वडिलांसोबत पुरेसा वेळ घालवायला नाही मिळाला आणि त्यामुळे तुमच्या नात्यावर काही परिणाम झाला का, असा प्रश्न तिला या मुलाखतीत विचारण्यात आला होता. त्यावर आयरा म्हणाली, “माझ्या आई-वडिलांसोबतच्या चांगल्या नात्यासाठी मी सतत प्रयत्न करतेय. कारण पालकांसोबतचं नातं हे तुमच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचं आणि गहिरं नातं असतं.”

याविषयी आयरा पुढे म्हणाली की, “कोणाचंही त्यांच्या आईवडिलांसोबतचं नातं सर्वांत गुंतागुंतीचं असतं कारण तुम्हाला त्यांच्या वक्तव्यांची जास्त काळजी असते. या गोष्टीला फार वेळ लागतो. पण त्यातून तुम्हाला सर्वाधिक आनंदसुद्धा मिळतो.” नैराश्याचा सामना करताना आयराला तिच्या आई-वडिलांसोबतच्या नात्यावर अधिक काम करण्याचा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला होता.

आईवडिलांसोबत आता कसं नातं आहे, याविषयी बोलताना आयराने सांगितलं, “माझ्या मते वडिलांपेक्षा आईसोबत संवाद साधणं आता थोडंसं सोपं आहे. पण मी दोघांशी उघडपणे बोलू शकते. माझ्या डोक्यात सतत असा विचार असतो की माझे वडील कदाचित व्यस्त असतील. जरी त्यांनी मला असं सांगितलं की कधीही गरज असेल तेव्हा कॉल कर. तरीसुद्धा मला असंच वाटतं की ते त्यांच्या कामात असतील. पण सध्या माझी आईसुद्धा व्यस्त आहे, कारण तिला तिच्या पालकांची काळजी घ्यायची आहे.”

26 वर्षीय आयरा ही आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ताची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वीच तिने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेशी साखरपुडा केला. हे दोघं लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments