Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज बाबरी मशिदीचा उल्लेख करत FTII मध्ये वादग्रस्त बॅनरबाजी: हिंदुत्वादी संघटनेकडून विद्यार्थ्यांना मारहाण...

बाबरी मशिदीचा उल्लेख करत FTII मध्ये वादग्रस्त बॅनरबाजी: हिंदुत्वादी संघटनेकडून विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यातील FTII म्हणजेच फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये पुन्हा एकदा चांगलाच वाद पेटला आहे. FTII परिसरात काही विद्यार्थ्यांनी बॅनर लावले होते. हे बॅनर ‘बेकायदेशीर’ शासनाच्या विरोधात आणि 16 शतकातील बाबरी मशीद ज्या ठिकाणी एकेकाळी उभी होती त्या ठिकाणी राममंदिराच्या बांधकामाचा निषेध म्हणून लावण्यात आले होते. ही बाब हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी तिकडे धाव घेत हे बॅनर जाळले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. वृत्तानुसार, दोन विद्यार्थिनींवर हल्ला करण्यात आला आहे.

हिंदुत्ववादी गटांनी FTII पुण्यात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला आणि “बाबरी लक्षात ठेवा” असे लिहिलेले बॅनर जाळले. हल्लेखोरांनी, “जय श्री राम” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांना लक्ष्य केले. या हल्ल्यात पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोपही केला जात आहे. बाबरी मशिदीचा उल्लेख करत हा बोर्ड FTII मध्ये लावण्यात आला होता. हिंदुत्वादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांना हे समजलं आणि या कार्यकर्त्यांनी FTII मध्ये घुसून या बोर्ड लावणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. पोलिसांनी मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णलायात पाठवले आहे. त्यानंतर FTII कॉलेजमध्ये सध्या तणावाचे वातावरण दिसून येत आहे.

या आधीही FTII च्या संचालक मंडळावरुन झाली होती चर्चा

गेल्या काही वर्षांपूर्वी सरकारच्या वतीने FTII च्या संचालकपदी अभिनेते गजेंद्र चौहान यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या नंतर येथील विद्यार्थ्यांनी त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत मोठे आंदोलन सुरू केले होते. गजेंद्र चौहान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित असून सिने-टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये त्यांचे फारसे योगदान नसल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला होता.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments