Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज बाप नव्हे हैवानच! बायकोच्या निधनानंतर अल्पवयीन मुलीवर वाईट नजर, 5 वर्ष करत...

बाप नव्हे हैवानच! बायकोच्या निधनानंतर अल्पवयीन मुलीवर वाईट नजर, 5 वर्ष करत होता दुष्कृत्य.. अखेर अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

फतेहपुर | 3 ऑक्टोबर 2023 : पिता किंवा वडील हे सर्व मुलांसाठी आदर्श असतात. पित्याचा हात पाठीवर असला की मुलांना कशाचीच भीती नसते. मात्र याच बाप-लेकांच्या नात्याल काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मुलीवरच वाईट नजर टाकणारा तो इसम पिता नव्हे खरंच हैवान होता.

उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे ही अत्यंत लाजिरवाणी (crime news) घटना घडली आहे. पत्नीच्या निधनानंतर आपल्या अल्पवयीन मुलीला आधार देण्याचे सोडून एका पित्याने पोटच्या लेकीचेच शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सतत 5 वर्ष तो नराधम हे कृत्य करत होता. त्याच्या भीतीमुळे ती निष्पाप मुलगी तोंडही उघडू शकत नव्हती. एवढंच नव्हे तर त्या हैवानाने दोन वेळा त्या मुलीचा गर्भपात (abortion) करायला लावल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. ही घटना ऐकणाऱ्या सर्वांचेच मन सुन्न झाले आहे.

हा सर्व प्रकार त्या मुलीच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर तिने कशीबशी हिंमत गोळा केली. आणि सर्व घटना तिच्या भावाला आणि कुटुंबियांना सांगितली. हे ऐकून सर्वच हादरले. तिच्या भावाने तर कपाळालाच हात लावला. त्यानंतर पीडितन मुलीने पोलिस स्टेशन गाठून स्वतःच्याच पित्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखवल करत बेड्या ठोकल्या.

5 वर्ष करत होता दुष्कर्म

ही घटना ललौली ठाणे क्षेत्रातील आहे. तेथे नराधम इसमाने 5 वर्ष पोटच्या अल्पवयीन लेकीवरच अत्याचार केला. पीडितेच्या आईचा 2018 साली मृत्यू झाला. त्यानंतर दुष्ट बाप अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवत राहिला. तिने विरोध दर्शवला असता त्याने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. त्याच्या अत्याचार नंतर पीडिता दोन वेळा गरोदर होती, तेव्हा त्याने मुलीचा गर्भपातही केला.

पित्याच्या या कृत्यामुळे पीडित तरूणी मानसिकरित्या उद्ध्वस्त झाली. ती याविषयी तोंडही उघडू शकत नव्हती. अखेर ५ वर्षांनी तिने कशीबशी हिंमत गोळा केली आणि या अत्याचाराला वाचा फोडण्याचे ठरवले. घडलेला सर्व प्रकार तिने तिच्या भावाला आणि कुटुंबातील सदस्यांना सांगितला. बापाचा खरा चेहरा समोर आल्यावर त्याचा मुलगाही हादरला. मात्र त्याने व कुटुबियांनी पीडितेला आधार देत पोलिस स्टेशन गाठले. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे, असे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

Recent Comments