Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज बाप्पा पावला, वरूणराजा जोरदार बरसला; पुण्यात ठिकठिकाणी पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी

बाप्पा पावला, वरूणराजा जोरदार बरसला; पुण्यात ठिकठिकाणी पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राज्यावर मॉन्सून सक्रिय असल्याने अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पुणे शहरात गुरूवारी आणि आज सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गणपती बाप्पा आले आणि पाऊस देखील सुरू झाल्याने बाप्पा पावला, अशीच पुणेकरांची भावना आहे.

पुणे शहरात सायंकाळी आकाशात काळ्या ढगांची गर्दी होऊन जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु, गुरूवारपासून पुन्हा जोर पकडला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. कमी दाबाची पट्टी सिक्किम ते दक्षिण महाराष्ट्रावर जात आहे. त्यामुळे येत्या ४८ तासांमध्ये मॉन्सून सक्रिय असेल. रायगड, भंडारा, नागपूर, गोंदियामध्ये मुसळधार ते जोरदार पाऊस होईल. इथे ऑरेंज अलर्ट दिला आहे. बऱ्याच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट आहे. २५ व २६ सप्टेंबर रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गणेशोत्सवात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ते पडणार आहे. पुणे व परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. २५ ते २७ सप्टेंबर दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

या हंगामात प्रथमच पावसाने जोर पकडला आहे. आज सायंकाळी शहरात सर्वत्र पाऊस बरसत आहे. रस्त्यात ठिकठिकाणी पाणी साचत असून, गणपती पहायला जाणार्या भाविकांची चांगली तारांबळ होत आहे. गणेशोत्सवात असल्याने पुणेकर सायंकाळी देखावे पहायला घराबाहेर पडत आहेत. परंतु पावसामुळे त्यांची अडचण होत आहे.

वाहतूक कोंडीत भर-

सायंकाळी अनेकजण घराबाहेर पडत असताना पावसामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

शहरात आज सकाळपर्यंत नोंदवलेला पाऊसशिवाजीनगर:

३.६ मिमी

पाषाण : ४.२ मिमी

लोहगाव : ७.० मिमी

चिंचवड : ४.० मिमी

लवळे : २२.५ मिमी

मगरपट्टा : ४० मिमी

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments