Tuesday, December 3, 2024
Homeक्राईम न्यूजबाणेर येथील टेकडीवर एमआयटीतील संशोधकांनी लावला नवीन कोळी प्रजातीचा शोध

बाणेर येथील टेकडीवर एमआयटीतील संशोधकांनी लावला नवीन कोळी प्रजातीचा शोध

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संशोधकांनी विज्ञान आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा उडी मारणाऱ्या कोळीच्या नवीन प्रजाती ‘ओकिनाविसियस टेकडी’ चा शोध लावला आहे. या कोळीची प्रजात बाणेर येथील टेकडीवर आढळून आल्याने तिच्या नावात टेकडी असा उल्लेख करण्यात आल्याचे या संशोधकांनी सांगितले.

या प्रजातीचे पहिले वर्णन एमआयटीच्या पर्यावरण शास्त्रातील एमएस्सीचा विद्यार्थी अथर्व कुलकर्णी आणि केरळमधील खाईस्ट कॉलेजच्या ऋषिकेश त्रिपाठी यांनी केले. त्यांना डॉ. पंकज कोपर्डे (एमआयटी) आणि डॉ. ए. व्ही. सुधिकुमार (खाईस्ट कॉलेज, केरळ) यांनी मार्गदर्शन केले. कुलकर्णी आणि त्यांच्या टीमने बाणेर टेकडीवरील फायकस आणि प्लुमेरिया या झाडांवर या कोळीचा अभ्यास केला आणि काही महिन्यांनंतर त्याला नवीन प्रजाती म्हणून मान्यता दिली.

कुलकर्णी म्हणाले, ही प्रजाती ‘ओ. टाकरेंसिस’ प्रजातीजवळ आहे, परंतु यामध्ये विशेष आकारात्मक फरक आहे. हे कोळी जाड फांद्या आणि घनदाट पानांवरील झाडांवर, विशेषतः प्लुमेरिया म्हणजे चाफा, फायकस म्हणजे वड, पिंपळ आणि महुआ अशा झाडांवर आढळले. राम-मुळा संगम क्षेत्रात याच प्रजातीला अलीकडे शोधले असून, त्याच्यासाठी योग्य पर्यावरणीय व्यवस्था आहे, असे त्यांनी सांगितले.

डॉ. कोपर्डे म्हणाले, गाले, ‘ओकिनाविसियस टेकडी ही प्रजाती बाणेर टेकडी आणि पुण्यातील इतर तत्सम जागांसाठी एक प्रतीक होऊ शकते. या शोधामुळे लोक शहरी टेकड्यांकडे आणि जंगलांकडे नव्या अभिमान आणि जबाबदारीच्या भावनेने पाहतील. हा शोध शहरी जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठीची धोरणात्मक गरज दर्शवतो, ज्यासाठी स्थानिक पातळीवर संरक्षणासाठी त्वरित पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

बाणेर टेकडीवरील गरुडकर जैव विविधता उद्यानात हा कोळी आढळला. मागील कैक वर्षांपासून गरुडकर उद्यानात मोठ्या प्रमाणात टेकडी संवर्धनाचे काम होत आहे. बाणेर हिल आणि पुण्यातील इतर टेकड्या त्यांच्या नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय महत्त्वामुळे प्रसिद्ध आहेत. हा कोळी जागरूकता वाढवून या परिसंस्थांसाठी संवर्धन उपक्रमांना चालना देऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, त्रिपाठी म्हणाले, संशोधक संघ आता पुढील अभ्यासात गुंतला असून, ‘ओकिनाविसियस टेकडी’ आणि इतर स्थानिक प्रजातींची त्यांच्या परिसंस्थेत काय भूमिका आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी त्याच्या निष्कर्षांवर एक सविस्तर शोधनिबंध प्रकाशित करण्याची तयारी केली आहे, ज्यामध्ये या अनोख्या कोळीच्या पर्यावरणीय परिणामांवर प्रकाश टाकला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments