Friday, June 14, 2024
Homeक्राईम न्यूजबाईकची विजेच्या खांबाला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, खडकवासला परिसरातील घटना

बाईकची विजेच्या खांबाला जोरदार धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, खडकवासला परिसरातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात दुचाकीची विजेच्या खांबाला जोरदार धडक झाली. या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास खडकवासला परिसरातील कुडजे येथे घडली. जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत उत्तमनगर पोलिसांनी मयत तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

यशोधन अविनाश देशमुख (वय-23) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर हर्षल दिपक पाटील (वय-24) हा गंभीर जखमी झाला आहे. दोघे तरुण जळगावचे असून सध्या पुण्यातील बावधनमधील पेंबल्स अर्बनीया सोसायटीमध्ये राहतात. याबाबत पोलीस हवालदार सचिन प्रभाकर गायकवाड यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यशोधन आणि हर्षल हे खडकवासला धारण परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी यशोधन भरधाव वेगात दुचाकी चालवत होता. कुडजे गावातून मुख्य रस्त्याने पुढे आगळंबे फाट्याकडे जात असताना साहिल हॉटेलच्या जवळ यशोधनचा दुचाकीवरील ताबा सुटला. दरम्यान, यशोधन याच्या दुचाकीची विजेच्या लोखंडी खांबाला जाऊन जोरात धडक झाली. या अपघातात यशोधनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर हर्षल गंभीर जखमी झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments