इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
छत्रपती संभाजीनगर: एक थरारक घटना समोर आली आहे. दोनकोटी रुपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांच्या ७ वर्षीय मुलाचे अज्ञातांनी अपहरण केले. अखेर अपहरण झालेला मुलगा सुखरुप सापडला आहे. जालन्यातील भोकरदन शिवारातून मुलाला ताब्याता घेण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांच्या ७ वर्षीय मुलाचे अज्ञातांनी अपहरण केले होते. मुलाचे अपहरण झाल्यानंतर बिल्डर तुपे यांना खंडणीसाठी फोन आला. त्यांनी वेळ न घालवता पोलिसांना कळवले. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. अपहरणकर्ते चेतनला घेऊन गेलेल्या गाडीचा अपघात जालन्यातील भोकरदन तालुक्यात झाला. या प्रकरणात अपहरणक केलेल्यांच्या गाडीचा अपघातच पोलिसांसाठी मोठा क्लू ठरला. गाडीचा अपघात झाल्यामुळे अपहरणकर्ते खूप दूर जाऊ शकले नाही.
ते जालन्यातील ब्रह्मपुरीजवळ थांबले. या अपघातात चालक जखमी झाला होता त्यामुळे त्याला भोकरदनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी तपास केल्यानंतर ब्रह्मपुरी गावाजवळ अपहरणकर्ते मुलाला शेतात घेऊन बसल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
अधिक माहिती अशी की, या प्रकरणी अपहरण झालेल्या मुलाची सुटका पोलिसांनी तपासची चक्र फिरवत २४ तासाच्या आत केली आहे. आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चेतन तुपे हा अपहरण झालेला मुलगा सुखरूप आहे. मुलाचे दोन कोटीच्या खंडणीसाठी काल रात्री आठ वाजता अपहरण केले होते. अपहरण करून लगेचच खंडणी मागितली होती.
तक्रारदार सुनील यांचे सासरे राजकीय नेते आहेत, त्यांचे बांधकामासह विविध व्यवसाय करतात. पोलीस आयुक्तांच्या देखरेखीखाली ३० पोलीस अधिकारी आणि जवळपास १२० कर्मचारी या घटनेचा तपास करत होते.