Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजबांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय : दरवर्षी 12000 हजार रुपये मिळणार

बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय : दरवर्षी 12000 हजार रुपये मिळणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला असून त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षितेसाठी त्यांना पेन्शन योजना जाहीर केली आहे. या योजनेतून 60 वर्षानंतर बांधकाम कामगारांना दरवर्षी 12000 रुपये म्हणजेच महिन्याला 1000 रुपये पेन्शन मिळणार असल्याची माहिती राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधिमंडळात दिली आहे. त्यांचा हा निर्णय बांधकाम कामगारांना मोठा दिलासा देणार आहे.

बांधकाम कामगारांना त्यांच्या वृद्धापकाळात राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय आर्थिक स्थैर्य मिळवून देणार आहे. अनेक वर्षांपासून या क्षेत्रातील कामगारांसमोर निवृत्तीवेतनाचा मोठा प्रश्न होता. कष्टाच्या काळात दिवसरात्र काम करणाऱ्या कामगारांना निवृत्तीनंतर आधार मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे सध्या मंडळाकडे नोंदणीकृत 58 लाख बांधकाम कामगार आणि त्यांचे कुटुंबीय तसेच भविष्यात नोंदणी होणारे बांधकाम कामगार लाभार्थी ठरणार आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बांधकाम कामगारांच्या भविष्यांची चिंता आता मिटणार आहे..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments