Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजबहिण-भावाचा निघून खून...! आरोपीला १० तासात अटक; तपासात धक्कदायक माहिती समोर

बहिण-भावाचा निघून खून…! आरोपीला १० तासात अटक; तपासात धक्कदायक माहिती समोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सातारा : आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावरील फलटण तालुक्यातील निंभोरे येथे बहीण-भावाचा निर्घण खून करण्यात अल्यची घटना घडली होती. सुमित तुकाराम शिंदे (वय-२०) व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित फाळके (वय-३५) अशी खून झालेल्या बहीण-भावाची नावे आहेत. ही घटना शनिवार २५ मे रोजी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

या खून प्रकरणातील आरोपीला ग्रामीण पोलिसांनी केवळ दहा तासांत अटक केली आहे. रणजित मोहन फाळके, (मुळगाव सातारा रोड, ता. कोरेगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चारित्र्याच्या संशयावरून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, निंभोरे गावात झोपडीवजा घरात सुमित हे त्यांच्या आई-वडिलांसोबत राहत होते. त्यांच्या समवेतच शीतल व रणजित फाळके हे पती-पत्नी देखील राहत होते. शनिवारी सकाळी सुमित व शीतल यांचे मृतदेह आढळून आले. दोघांच्या अंगावर धारधार शस्त्राने वार करून निर्घण खून केल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राहुल धस, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा तपास करत असताना मृत शीतल हिने दोन वर्षापूर्वी पहिला नवरा कनवऱ्या भीमऱ्या पवार (रा. वाळवा, जि. सांगली) याला सोडून दिले होते.

त्यानंतर ती रणजित फाळके याच्यासोबत निंभोरे येथे तिच्या आई, वडिलांजवळ त्यांच्या झोपडीतच राहत होती. घटना घडली त्या रात्री आरोपी फाळके हा त्यांच्यासोबतच झोपडीत झोपला होता. सकाळी मृतदेह मिळाल्यानंतरही तो त्या ठिकाणी फिरत होता. मात्र, घटनास्थळावर पोलीस येताच त्याने पळ काढला होता.

छातीवर वार करून निर्घण खून

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मोबाईल लोकेशच्या आधारे आरोपीला सातारारोड येथून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने घटनेच्या मध्यरात्री शीतल झोपेतून उठून पुरुषाबरोबर बाहेर जाताना दिसल्यामुळे मी चाकू घेऊन तिच्या मागे गेलो. काही अंतरावर गेल्यानंतर शीतलला गाठुन मी तिच्या छातीवर चाकूने वार करून तिचा खून केला.

त्यावेळी तिच्यासोबत असलेला तिचा भाऊ सुमित शिंदे याला मी अंधारात न ओळखल्यामुळे तो एक पुरुष असल्याचे समजून मी त्याच्याही छातीत चाकू खुपसून खून केल्याची कबुली दिली. दरम्यान, पोलिसांनी आरोपी फाळके याला अटक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments