इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : स्वारगेट एसटी बस स्थानकातुन चोरीची घटना समोर आली आहे. येथे प्रवाशाकडील लॅपटॉप चोरीला गेल्याची घटना घडली आहे. चोरट्याविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रितेश गजानन बकरे (वय 20) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितेश बकरे हे रविवारी स्वारगेट बस स्थानकातून साताऱ्याला निघाले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते एसटी बसची वाट पाहत थांबले असता चोरट्याने त्यांची नजर चुकवून लॅपटॉपची बॅग चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निकिता पवार तपास करत आहेत.
स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या प्रकारानंतर तेथे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. तरीही स्थानकाच्या आवरात प्रवाशांकडील लॅपटॉप चोरीला जाण्याच्या घटना सतत घडत आहेत.