Tuesday, September 10, 2024
Homeक्राईम न्यूजबनावट तिकिटावर विमान प्रवास करण्याचा प्रयत्न; एजंटसह, दोघांवर गुन्हा दाखल

बनावट तिकिटावर विमान प्रवास करण्याचा प्रयत्न; एजंटसह, दोघांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर बनावट तिकिटांच्या माध्यमातून इंडिगोच्या विमानाने उड्डाण करण्याचा डाव आखणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच तरुणाला विमान तिकीट काढून देणाऱ्या उत्तर प्रदेशातील ट्रॅव्हल एजंटसह दोघांवर विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी विमानतळ प्रशासनाच्या वतीने तुषार विश्वनाथ अंधारे (वय-32, रा. धानोरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी सलीम गोलेखान (वय-24, रा. मोहननगर, जमजम बिर्याणी हाऊस, चिंचवड) आणि नसरुद्दीन खान (उत्तर प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सलीम गोलेखान याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलीम गोलेखान याचे चिंचवडमध्ये बिर्याणी हाऊस आहे. त्याला वडिलांसह तातडीने लखनऊला जायचे होते. त्याने ट्रॅव्हल एजंट नसरुद्दीन खान याच्याकडून दोन तिकिटे काढली होती. इंडिगो एअर लाईनच्या विमानाने सलीम गोलेखान आणि त्याचे वडील लखनऊला जाणार होते. पुणे विमानतळावर सलीम आणि त्याच्या वडिलांनी प्रवेश केला. सलीम आणि त्याच्या वडिलांच्या तिकिटावर असलेल्या क्रमांकाची (पीएनआर) खातरजमा करण्यात आली.

यावेळी तपसणीत सलीम याच्या तिकिटावर असलेला क्रमांक बनावट असल्याचे आढळून आले. विमान तिकिटाच्या क्रमांकात फेरफार करून प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सलीम गोलेखानला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या वडिलांच्या तिकिटावरील क्रमांक जुळल्यानंतर त्यांना विमानतळावर प्रवेश देण्यात आला. सलीमकडे तिकिटाबाबत चौकशी करण्यात आली. तेव्हा उत्तर प्रदेशातील एजंट नसरुद्दीन खान याने तिकीट काढून दिल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सलीमविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संकेश्वरी करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments