इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
आपल्या शरीराचा दिवा म्हणून डोळ्यांकडे पाहिले जाते. त्यामुळे डोळ्यांची योग्य ती काळजी घेणे वेळीच घेणे गरजेचे बनते. डोळ्यांची कमजोरी हलक्यात घेण्याची चूक करू नका. हात आणि पायांच्या कमकुवतपणाप्रमाणे, हे देखील त्रासदायक ठरू शकते. सध्या डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे आणि डोळ्यांची काळजी न घेतल्याने दृष्टी अकाली कमकुवत होऊ शकते.
दृष्टी कमकुवत झाल्यास चष्मा वापरण्याचा सल्ला दिला जातो. पण, या चष्म्यांपासून मुक्त होण्यासाठी लोक शस्त्रक्रिया आणि सप्लिमेंट्सचा आधार घेतात. हे एक वेदनादायक आणि महाग ठरू शकते. पण तुम्हाला आता काळजी करण्याची काहीच गरज नाही. नैसर्गिक गोष्टींच्या सहाय्याने डोळ्यांची दृष्टी मजबूत करता येऊ शकते. त्यासाठी 15 ते 20 बदाम ग्राइंडरच्या भांड्यात ठेवा. सोबत थोडी बडीशेप घाला. नंतर त्यात 10 ते 15 काळी मिरी आणि थोडी साखर घालून बारीक करा. त्यांची पावडर तयार झाल्यावर ती रिकाम्या एअर टाईट डब्यात ठेवा.
तयार केलेले हे मिश्रण एक चमचा कोमट दुधात मिसळा आणि रोज प्यायला सुरुवात करा. हा उपाय फक्त 2-3 दिवस केल्याने परिणाम दिसू लागतील आणि ज्यांना चष्मा आहे त्यांची दृष्टी आणखीन मजबूत होऊ शकते.