Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजबदलापूरनंतर आता पुण्यात; संतापजनक घटनेवर गृहमंत्री फडणवीसांनी दिले आदेश, म्हणाले...

बदलापूरनंतर आता पुण्यात; संतापजनक घटनेवर गृहमंत्री फडणवीसांनी दिले आदेश, म्हणाले…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : मागील काही दिवसांपासून देशात महिलांवरील अत्याचाराच्याघटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बदलापूर येथेही दोनचिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं प्रकरण पुढं आलंहोतं. अशातच आता पुण्यात दोन शाळकरी मुलींसोबत अत्याचारझाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वानवडी येथे स्कूल

बसमध्ये दोन अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटनाउघडकीस आली आहे. याप्रकरणी ड्रायव्हर संजय जेटिंग रेड्डी यालाअटक करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सर्व संस्थाचालकांना बोलावून त्यांना संस्थेत काम करत असलेल्या सर्व कर्मचा-यांचे वर्तन योग्य आहे की नाही याबाबत तपासणी करण्यास सांगितले आहे. तसेच आरोपीविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर कठोर कलमे लावण्यात आली आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, याप्रकरणाशी संबंधित असलेल्या संस्था चालकांना बोलावण्यात आलं आहे, त्यांचा दोष आहे का? ते तपासलं जाणार आहे. इतर सर्व शैक्षणिक संस्थांना सांगितलं जात आहे की विद्यार्थ्यांच्या ट्रान्सपोर्टेशनची जी काही पद्धत आहे. त्यामध्ये वाहन चालक म्हणून काम करणारे योग्य आहे की नाही, याची तपासणी करायला हवी, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments