Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजबँकेत नोकरी करण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण; 'या' बँकेत निघाली भरती...

बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण; ‘या’ बँकेत निघाली भरती…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : बँकेत नोकरी मिळवण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जातात. त्यात विविध परीक्षा, मुलाखती दिल्या जातात. पण तरीही काहीवेळा नोकरी मिळण्याची ही संधी हुकतेच. मात्र, अजूनही तुम्ही बँकेत नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, एका बँकेत आता नोकरी मिळू शकणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. संभाजीनगरच्या सिद्धेश्वर अर्बन को-ऑप बँक मर्यादित, सिल्लोड येथे शाखा व्यवस्थापक, अंतर्गत लेखापरीक्षक, कायदेशीर सल्लागार, लिपिक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संभाजीनगर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या 14 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2025 असणार आहे.

या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी पालोदकर बिल्डिींग, मेन मार्केट, सिल्लोड, ता. सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर 431112 येथे अर्ज पाठवावा लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://siddheshwarbank.com/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments