इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुणे सारख्या शहरात स्वतःचा फ्लॅट असावा हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेकवेळा यासाठी पती-पत्नीमध्ये देखील वाद होताना दिसतात, पण नुकतीच पिंपरी चिंचवडमधून अशी एक बातमी समोर आली आहे. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. फ्लॅट घेण्याच्या वादातून पतीने आपल्या पत्नीचाचं गळा दाबून हत्या केली आहे.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन परिसरात हे जोडपं वास्तव्यास होते. पती प्रकाश जाधव असं आरोपीचं नाव असून, मनिषा प्रकाश जाधव अस हत्या करण्यात आलेल्या पत्नीचे नाव आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पती प्रकाश जाधव हा स्कूल बस ड्रायव्हर असून काही दिवसांपूर्वी त्याची नोकरी गेली होती, त्यानंतर तो उदरनिर्वाहासाठी रिक्षा चालवत होता. नोकरी गेल्यानं त्यांच्या घरात आर्थिक अडचण होती. मंगळवारी त्यांच्यात पुन्हा एकदा घर घेण्यावरून वाद झाला होता. या वादात पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली.
काही वेळाने त्यांचा मुलगा घरी आल्यावर रुग्णवाहिका आणण्याच्या बहाण्याने वडील घरातून बाहेर पडले ते परत न आल्याने मुलाने हत्या झाल्याची तक्रार बावधन पोलिसांना दिली. मुलाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. आरोपी पती सोलापूरच्या दिशेने फरार होत असताना त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी बावधन पोलीस पुढील तपास करत आहेत.